Wednesday, July 9, 2025

गांगुली, सेहवाग पुन्हा मैदान गाजवणार

गांगुली, सेहवाग पुन्हा मैदान गाजवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकेकाळी मैदान गाजवणारे सौरव गांगुली, विरेंद्र सेहवाग, कैफ, पठाण हे भारताचे दिग्गज खेळाडू पुन्हा क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १५ सप्टेंबरला इंडिया महाराजास आणि वर्ल्ड जाएंट्स यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर महासंग्राम होणार आहे. लिजंट्स लीग क्रिकेट (एलएलसी) निमित्त भारत आणि जगभरातील माजी दिग्गज खेळाडू आमनेसामने असतील.


लिजंट्स लीग क्रिकेट लीगच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होणार आहे. १५ सप्टेंबरला इंडिया महाराजास आणि वर्ल्ड जाएंट्स यांच्यात सामना होणार आहे. सहा शहरांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. या लीगमधील इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स या दोन संघांतील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली आहेत. कोलकाता येथील इडन गार्डनवर १५ सप्टेंबरला पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.


इंडिया महाराजास संघ - सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी.


वर्ल्ड जाएंट्स - इयॉन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा, मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन.

Comments
Add Comment