आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर

Share

मुंबई (प्रतिनिधी) : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा प्रामाणिक व नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचे हित जपणे गरजेचे आहे. त्यामुळे महावितरणने वीजचोरी करणाऱ्यांविरोधात कारवाईची बडगा उगारला आहे. त्यानुसार महावितरणच्या भरारी पथकांनी एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात वीजचोरीची तब्बल १३१ कोटी ५० लाखांच्या २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

वीजचोरी व विजेचा गैरवापर आणि इतर अनियमिता आटोक्यात आणण्यासाठी तसेच वीजचोरांविरूध्द अति जलद कारवाई करण्यासाठी विभागीय स्तरावर आणखी दहा नवीन भरारी पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकतीच सुरक्षा व अंमलबजावणी विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलतांना सिंघल म्हणाले की, महावितरणची आर्थिक घडी सुधारण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे भरारी पथकांनी अधिक सक्षमपणे काम करून वीजचोरीस लगाम घालावा, असे निर्देश त्यांनी दिले आहे.

सध्या महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागात ६३ भरारी पथकांसह आठ अंमलबजावणी युनिटस कार्यरत आहेत. या भरारी पथकांनी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल, मे आणि जून या प्रथम तिमाहीत वीजचोरीची २३९.५८ दशलक्ष युनिटच्या वीजचोरीची तब्बल २ हजार ६२५ प्रकरणे उघडकीस आणून वीजचोरांकडून सुमारे ५४ कोटी १६ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला आहे. उर्वरित बिलांची रक्कमही लवकरात लवकर संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश विजय सिंघल यांनी दिले.

कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत-२२, पुणे प्रादेशिक कार्यालय-१४, नागपूर प्रादेशिक कार्यालय- १५ तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयालयात – १२ भरारी पथके कार्यरत आहेत. त्यात नोव्हेंबर-२०२१ पासून विभागीय कार्यालय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या २० भरारी पथकांचा समावेश आहे. प्रत्येक भरारी पथकाने दर महिन्याला वीजचोरीची जवळपास २० प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

मागिल तीन आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी वीजचोरांवर अंकूश लावण्यात यश मिळविले असून २०१९-२० या आर्थिक वर्षात ९२५० प्रकरणांत ९७.५० कोटींची वीजचोरी उघडकीस आणली. तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात कोरोना महामारीत शासनाच्या विविध निर्बंधामुळे वीजचोरांविरूध्द कारवाया करण्यावर मर्यादा आल्या असल्या तरी ७१६९ एवढ्या मोठ्या संख्येने वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. यात ८७.४९ कोटींची वीजचोरी पकडण्यात आली. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षात वीजचोरीची तब्बल १३ हजार ३७० प्रकरणे उघडकीस आणण्यात भरारी पथकांना यश आले. त्यात वीजचोरीची रक्कम २६४.४६ कोटी एवढी आहे.

सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने वीजहानी कमी करण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. वीजचोरीच्या एकूण अनुमानित रक्कमेपैकी २०१९-२० या आर्थिक वर्षात ५४.३६ कोटी, २०२०-२१ या वर्षात ५३.१८ कोटी तर २०२१-२२ या वर्षात १२४.९८ कोटी रुपयांची अनुमानित रक्कमेची वीजबिले वीजचोरांकडून वसूल करण्यात आली. वीजचोरी करणे, विजेचा गैरवापर करणे किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणे हा भारतीय विद्युत कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रामाणिकपणे विजेचा वापर करून कोणत्याही प्रकारे विजेची चोरी करू नये, असेही आवाहन विजय सिंघल यांनी केले आहे.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

41 minutes ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

2 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

3 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

3 hours ago