मुंबई : बिहारमध्ये भाजपचे ७५ आमदार निवडून आले होते. तर संयुक्त जनता दलाचे ४२ आमदार निवडून आले होते. तरीही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे भाजप मित्रपक्षांना कधीही धोका देत नाही, असे भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना चोख उत्तर दिले आहे. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्रात शिवसेना आमच्यासोबत होती. पण त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्यासोबत आली. आता शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्यासोबत ५० आमदार आहेत. तरीही भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यामध्ये त्यांच्या आणि आमच्या प्रत्येकी ९-९ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामुळे मला असे वाटते की, पवार साहेबांचे दु:ख वेगळे आहे. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना चिमटा काढला.
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…