बापामती : भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. वेळीच सावध होत नितीश कुमार यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याचेही शरद पवारांनी नमुद केले. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याने राजकीय भुकंप झाले आहे. त्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, जेपी नड्डा म्हणतात की देशात फक्त भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील, छोटे-छोटे पक्ष संपतील. यातून एकच स्पष्ट होते की, नितीश कुमार यांची जी तक्रार आहे. त्यातून हे समजते ही भाजपला मित्रपक्षाला संपवायचे आहे. नितीश कुमार यांनी वेळीच सावध होऊन शहाणपणा दाखवल्याचे मत पवारांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्हे घ्यावे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचेच असल्याचे वक्तव्य पवारांनी केले. एखाद्या पक्षाचा चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…