कल्याण (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १ जून पासून स्वाइन फ्लूचे ४८ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २२ रुग्ण औषधोपचाराखाली आहेत व २४ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर स्वाइन फ्लू मुळे ५८ वर्षीय पुरुष आणि ५२ वर्षीय महिला या २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्यबाबत महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून लोकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतःला अलगीकरण (आयसोलेट) करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे.
महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच वसंत व्हॅली येथे स्वाइन फ्लूचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आली आहेत. हि लस दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती व फ्ल्यू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. हि लस कोरोना लसी सोबत घेण्यात येऊ नये तसेच कोरोना लस व स्वाइन फ्लू लस यामध्ये किमान दोन आठवड्याचे अंतर असावे.
ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो आणि यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…