मुंबई (वार्ताहर) : मुंबई पालिकेने पाली हिल रोडवरील १०० हून अधिक दुकानांना नोटीसा बजावल्या आहेत. फेरीवाल्यांना त्यांच्या दुकानातून व्यवसाय करण्यास किंवा त्यांचे सामान लपविण्यास मदत केल्यास परवाना रद्द करण्यासह कडक कारवाईचा इशारा या दुकानांना दिला आहे.
“पालिकेचे वाहन पाहून काही बेकायदेशीर फेरीवाले हिल रोडच्या फूटपाथला लागून असलेल्या दुकानांमध्ये आपला माल लपवतात आणि घटनास्थळावरून पळून जातात. हिल रोडलगत असलेले दुकानदार आणि सोसायटी अशा बेकायदेशीर फेरीवाल्यांना त्यांचा माल त्यांच्या दुकानात लपवू देतात आणि त्यामुळे अशा अवैध फेरीवाल्यांना पालिकेची कारवाई टाळण्यास मदत होते.
त्यामुळे बेकायदा फेरीवाले माघारी फिरतात आणि जनतेला अडथळा व त्रास होतो, असे पालिकेतर्फे बजावलेल्या नोटीशीत म्हटले आहे. पालिकेने नोटीसमध्ये पुढे म्हटले आहे की अशा कृतींमुळे जप्ती कारवाईची कार्यक्षमता कमी होते आणि नागरी अधिकाराच्या मार्गात अडथळे निर्माण होतात, असे पालिकेचे म्हणणे आहे.