जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) : आयसीसीचे माजी अंपायर रुडी कर्टझन यांचे मंगळवारी कार अपघातात निधन झाल्याची माहिती मिळाली. ते ७३ वर्षांचे होते. रुडी हे एक आयसीसीचे सर्वोकृष्ट अंपायर पैकी एक होते.
मिळालेल्या माहितीनुसार रुडी यांच्याबरोबरच इतर तीन जणांची रस्ते अपघातात समोरासमोर जोरदार धडक झाली. ही घटना मंगळवारी सकाळी दक्षिण आफ्रिकेच्या रिडरडेल भागात घडली. रुडी हे एक आयसीसीचे सर्वोकृष्ट अंपायर पैकी एक होते. त्यांना ३३१ सामन्यांचा अंपयरिंगचा अनुभव होता.
रुडी यांनी १९९२ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथील दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापासून आपल्या अंपायरिंग कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी २०९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि १४ टी-२० सामन्यात अंपायरिंग केली आहे. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील १९९९ मध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सुरूवातीच्या सामन्यात त्यांनी स्मरणीय अंपायरिंग केली होती. त्यांनी २००३ आणि २००७ च्या वर्ल्डकप फायलनमध्ये देखील थर्ड अंपायरची भूमिका बजावली होती. २०१० मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय अंपायरिंगमधून निवृत्ती घेतली.