Wednesday, October 9, 2024
Homeमहत्वाची बातमीकोरोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस

कोरोनानंतर चीनमध्ये आढळला आणखी एक जीवघेणा व्हायरस

बिजींग : कोरोना आणि मंकिपॉक्सनंतर आता चीनमध्ये आणखी एक जीवघेणा व्हायरस आढळून आला आहे. झुनोटिक लंग्या असे त्या व्हायरसचे नाव असून चीनमध्ये आत्तापर्यंत ३५ जणांना याची लागण झाली आहे. करोनामुळे मोठ्या प्रमाणात अनेक देशांची हानी झाली होती. त्यानंतर आता या भलत्याच आजारामुळे चीनच्या आरोग्य प्रशासनासमोर नवे संकट उभे राहिले आहे.

आत्तापर्यंत पाच टक्के कुत्री आणि दोन टक्के शेळ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे पाळीव प्राणी असणाऱ्या व्यक्तींनी सतर्क राहण्याची गरज आहे. या विषाणूची लागण झालेल्या ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. हे रुग्ण एकमेकांच्या संपर्कात नव्हते. एवढचं नाही तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील इतर लोकांनाही या व्हायरसची लागण झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा विषाणू एका माणसातून दुसऱ्या माणसात पसरण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.

लंग्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळणे, डोके दुखणे उलट्या होण्यासारखी लक्षणे आढळून येतात. तसेच त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशींचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून आले आहे. एवढचं नाही तर हा आजार बळावला तर रुग्णाचे यकृत आणि किडनी निकामी होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -