मुंबई : मुंबईत रविवारी (७ ऑगस्ट) तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक आहे. रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील कामासाठी उद्या हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य, पश्चिम आणि हार्बरच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिरानं उशिरानं लोकल धावतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबतील. पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटं उशिरानं लोकल धावतील.
हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक
पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे येथे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ- खारकोपर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर वसई यार्ड ते दिवा अप डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. रात्री 12.15 ते मध्य रात्री 3.15 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वसई यार्डातील काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…