Tuesday, November 5, 2024
Homeक्रीडाबजरंग पुनियाची गोल्डन कामगिरी, ६५ किलो वजनी गटात जिंकले सुवर्ण

बजरंग पुनियाची गोल्डन कामगिरी, ६५ किलो वजनी गटात जिंकले सुवर्ण

बर्मिंगहॅम : भारताने कॉमनवेल्थ स्पर्धेत आज आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५ किलो वजनी गटात कॅनडाच्या मॅकनील याला मात देत ही कामगिरी केली आहे. त्याने कॅनडाच्या २१ वर्षाच्या लॅचलीन मक्नेलचा पराभव केला. बजरंगने मक्नेलचा ९ – २ असा पराभव केला.

बजरंगचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे गोल्ड मेडल आहे. त्याने २०१८ मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत देखील ६५ किलो वजनी गटात सुवर्ण कमाई केली होती. तर २०१४ ला ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली होती. बजरंगच्या सुवर्ण पदकामुळे भारताचे पदक तालिकेत आता ७ सुवर्ण झाले आहेत.

६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियाने पहिल्या फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याने पहिल्याच सत्रात ४ गुण मिळवत मोठी आघाडी घेतली. त्यानंतर मॅक्नेलने दुसऱ्या डावात आक्रमक खेळी करत दोन गुण मिळवले.

त्यानंतर बजरंग पुनियाने मॅक्लेनला रिंगच्या बाहेर ढकलत दोन गुण मिळवत पुन्हा आघाडी ४ गुण मिळवले. बजरंग पुनियाने मॅक्लेनच्या पायावर सातत्याने आक्रमण केले. त्याने पुन्हा रिंगच्या बाहेर ढकलत एक गुण मिळवला. सामना संपता संपता बजरंगने दोन गुण मिळवत सामना ९ – २ असा एकतर्फी जिंकला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -