तैवान : अमेरिकेच्या महिला नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी बुधवारी 3 ऑगस्ट रोजी तैवानचा दौरा पूर्ण केला आहे. त्यांच्या या दौऱ्यानंतर तातडीने चीनच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या दौऱ्यानंतर चीनने तैवानवर अनेक आर्थिक निर्बंध लादले आहेत. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची वेबसाइट काही काळासाठी हॅक झाली होती. चीनच्या हॅकर्सने हे हॅकिंग केले असल्याचे समजले असून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर सध्या तैवानच्या प्रदेशाची सायबर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला तैवानच्या अध्यक्षीय कार्यालयासह अनेक सरकारी वेबसाइट्सना सायबर हल्ल्याचा फटका बसला होता. आणखी तीन रशियाच्या हॅकर्सनी या वेबसाइट हॅक केल्याचं काही अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे चीन आणखी सतर्क झाला असल्याचे बोलले जात आहे.