मुंबई : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या ७ ऑगस्टपूर्वी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि शिंदे गटात मंत्री संख्या आणि खात्यांवर एकमत झाले आहे. मंत्रिमंडळात ३५ जणांना संधी मिळणार आहे. शिंदे गटाला सरकारमध्ये ४० टक्के हिस्सा मिळेल. मंत्रिमंडळात भाजपच्या कोट्यातील २१ मंत्री मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, तर शिंदे गटाला १२ मंत्रीपदे मिळू शकतात. २ मंत्री इतर छोट्या मित्रपक्षांना दिले जातील.
मंत्रिमंडळासोबतच विभाग विस्तारावर देखील चर्चा झाली आहे. भाजपकडे गृह, वित्त आणि महसूल अशी मोठी खाती तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडे नगरविकास आणि रस्तेबांधकाम खाती दिली जाऊ शकतात. दीपक केसकर म्हणाले की, मंत्रिमंडळाबाबत सर्व काही निश्चित झाले आहे.