मुंबईत गुरुवारी पाणी कपात

  181

मुंबई (प्रतिनिधी) : भांडुप संकुल येथील तानसा जलवाहिनीच्या कामासाठी मुंबई शहरासह उपनगरात गुरुवारी १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. तर ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. मुंबई पालिकेकडून भांडुप संकुल येथील जुन्या महासंतुलन जलाशयापासून सुरू होणाऱ्या तानसा जलवाहिनीचे, बीपीटी लाईनचे (ब्रेक प्रेशर टनेल) व नवीन महासंतुलन जलाशयातून निघणाऱ्या तानसा जलवाहिनीबरोबर छेद जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.


भांडुप संकुल येथील १९१० दशलक्ष उदंचन केंद्रातील दोन १२०० मिलीमीटर व्यासाच्या स्लुईस झडपा बदलणे आणि येवई येथे नवीन तानसा जलवाहिनीवरील क्लोरिन इंजेक्शन लाईनवरील झडप बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई शहर व दोन्ही उपनगरात १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याच कालावधीत ठराविक परिसरात पाणीपुरवठा होणार नाही.


दरम्यान पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे व शहर या विभागातील संपूर्ण क्षेत्रात पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणी कपात करण्यात येईल. एस विभाग गावदेवी टेकडी, सर्वोदय नगर येथे पाणी पुरवठा बंद राहील. त्यानंतर कांजुर (पश्चिम) ते विक्रोळी स्थानकासह लालबहादूर शास्त्री मार्गालगतचा दोन्ही बाजूंचा परिसर, सुर्यानगर, चंदन नगर, विक्रोळी स्थानक मार्ग (पश्चिम) येथेहीपाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. रमाबाई नगर I आणि II , दिन्शॉ पूल ते भांडुप जलाशय परिसर (पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून साई हिल, टेंभीपाडा, एँथोनी चर्च, कामराज नगर परिसर, पाटकर कंपाऊंड परिसर महाराष्ट्र नगर, फरिद नगर, काजू टेकडी, कांबळे कंपाऊंड येथे (पहाटे ५ ते सकाळी १० वाजता - ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता