मुंबई : उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता, तुमच्या पक्षप्रमुखांनी आपले सगळे पैसे आणि प्रॉपर्टी नंदकिशोर चतुर्वेदी कडे देऊन ठेवली आहे ते चालते का? तेव्हा मराठी माणूस आठवला नाही?? असा टोमणा भाजपा आमदार नितेश राणे यांनी मारला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी कोणाचाही अपमान केला नसल्याचे नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना श्रीमंत केले, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना महापालिकेचे कंत्राट दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.
आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांचे समर्थन करताना सांगितले की, मी त्या कार्यक्रमात होतो. राज्यपाल काहीच वावगं बोलले नाही. त्यांनी मुंबईच्या उत्कर्षात योगदान देणाऱ्या त्या त्या समाजाची आठवण करून दिली. राज्यपालांनी कुणाचा अपमान केला असता तर आम्ही बोललो असतो. त्यांनी त्या त्या समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. त्यांनी मराठी माणसाचा अपमान केला असे मला बिलकूल वाटत नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
बंगळुरू : आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४४ सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये सर्व संघांनी केलेल्या…
पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे कन्नड तालुक्यात एका लग्न समारंभातील जेवणातून तब्बल…
अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे…
जम्मू आणि काश्मीर: पहलगामध्ये (Pahalgam Terror Attack) झालेली भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलण्यास…
मंत्री नितेश राणे यांनी दिला दापोलीवासीयांना विश्वास दापोली : आज आजूबाजूची परिस्थिती बदलत आहे, त्यामुळे…