नवी दिल्ली : देशातील एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत आहे, तर दुसरीकडे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्गही वाढतो आहे. गेल्या २४ तासांत देशात २० हजार ५५७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून बुधवारी ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण आधीच्या दिवसाच्या तुलनेत अधिक आहे. आधीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी १८ हजार ३१३ कोरोना रुग्णांची नोंद आणि ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. देशात बुधवारी दिवसभरात १९ हजार २१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
https://twitter.com/MoHFW_INDIA/status/1552516930132537346
देशात नवीन कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण घटले आहे. मंगळवारी दिवसभरात ५७ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर बुधवारी दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात किंचित घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३२३ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.३३ टक्के आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४७ टक्के आहे.