पुणे : जुलै महिन्याच्या सुरवातीपासून राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. मात्र पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. या १५ ते २० दिवसांच्या कालावधीत राज्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे काही भागांत पूरपरिस्थितीही निर्माण झाली होती. दरम्यान, पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्यानं येत्या २ ते ३ दिवसांत राज्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिला आहे.
27 July, राज्यात ह्या 2,3 दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासहीत 🌩🌩 पावसाची शक्यता.
इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाउस. ⛅🌧
मुंबई ठाणे भागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत…
-IMDFor detail info pl visit IMD websites
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 27, 2022
या महिन्याच्या सुरुवातील पडलेल्या पावसाने कोकणात चागंलीच बॅटिंग केली आहे. कोकण पाठोपाठ विदर्भ, मुबंईसह पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा अधिक प्रभाव जाणवला आहे. त्यामुळे अनेक धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. दरम्यान, या दोन ते तीन दिवसांत होणाऱ्या पावसाचा मुंबई, ठाणे भागात प्रभाव अधिक असणार नाही, अशी माहितीही हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान, या महिन्यातील पावसाने कोकण, मुबंई, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. पुण्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक पावसाची नोंद २०१४ मध्ये ५३.१ मिलिमीटर तर, त्याआधी १९६७ मध्ये ७१.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पुढील चार दिवस शहरासह राज्यात अंशतः ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.