मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईसारख्या मोठ्या महानगरांतील रहिवाशांसाठी काँक्रीटच्या जंगलात हिरवीगार जागा शोधणे हे कठीण आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने ही हिरवाई टिकवली आहे. गजबजलेले शहर असलेल्या रहदारीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळच्या कॉरिडॉरमधून चालत असताना ही हिरवाई ग्रीन लँडस्केप दिसून येते.
८० हजार चौ.मी. पेक्षा अधिक पसरलेल्या लँडस्केप क्षेत्राच्या परिसरात ४ हजारांपेक्षा अधिक झाडे आहेत. त्यात १३६ विविध प्रजातींची छोटी झाडे, ग्राउंड कव्हरिंग प्लांट्स, पाम ट्री, वेल यासह विविध झाडांचा समावेश आहे. विमानतळाच्या परीसरात आढळलेल्या एकूण झाडांपैकी २३० पेक्षा अधिक फुलझाडे आहेत. एअरसाइड क्षेत्रामध्ये सुमारे ११,२२,७२४ चौरस मीटरवर हिरवे आच्छादन आहे. तो गवताचा भाग आहे. या हिरवळीमुळे प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.
विमानतळावर भारतातील सर्वात मोठे अंतर्गत लँडस्केप आहे आणि टर्मिनल – २ (टी२) च्या विखुरलेल्या ठिकाणी १००० चौ.मी. पेक्षा जास्त हिरव्या भिंती आहेत. टी-२ चा एक महत्त्वाचा घटक म्हणजे इन-सिटू वृक्षारोपण, हिरव्या भिंती आणि इमारतीच्या आत आणि आजूबाजूला पाण्याची वैशिष्ट्ये आहे. भारतात, सर्व स्तरांवर इन-सिटू इनडोअर प्लांटिंगसह हे पहिले एकात्मिक टर्मिनल आहे.
महामारीच्या काळातही ही हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या हिरवळीची काळजी घेण्याकरिता ९३ पेक्षा जास्त माळी, ०७ पर्यवेक्षक, ०६ बागायतदार आणि ०६ सिंचन तंत्रज्ञ १० ते २५ कारागीर यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांत, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परीसरात एका एनजीओच्या सहकार्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथून ८ हजार झाडे आणि नवी मुंबई येथून आणलेली १२०० झाडे लावली आहेत.