सोनिया गांधीची ६ तास ईडी चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावले

नवी दिल्ली (हिं.स.) : नॅशन हेराल्डशी संबंधीत मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची 6 तास चौकशी केली. त्यांच्या चौकशीची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान ईडीने त्यांना उद्या, बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.


नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मंगळवारी ईडीने सोनिया गांधींची दोन फेऱ्यांमध्ये चौकशी केली. सोनिया गांधी या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह दिल्लीतील एपीजे अब्दुल कलाम रोडवरील विद्युत लेनमध्ये असलेल्या ईडीच्या कार्यालयात सकाळी ११ वाजता पोहोचल्या. यानंतर ईडी कार्यालयातून दुपारच्या जेवणासाठी निघाल्या. तसेच दुपारी ३.३० वाजता परत आल्या. याप्रकरणी २१ जुलै रोजी सोनिया गांधी यांची पहिल्यांदा दोन तास चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणी राहुल गांधी यांची ५० तासांहून अधिक चौकशी झाली आहे.


दुसरीकडे, सोनिया गांधी यांच्या चौकशी सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी रस्त्यावर निदर्शने केली. काँग्रेसने ईडीच्या कारवाईला राजकीय द्वेषाचे कृत्य म्हटले आहे. राहुल गांधी आणि इतर काँग्रेस खासदारांनी आज संसद भवनापासून मोर्चा काढला. हे सर्वजण राष्ट्रपती भवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना विजय चौकात अडवले. यानंतर या नेत्यांनी तेथे धरणे दिले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतले.

Comments
Add Comment

कुत्रा चावल्यास मोबदला राज्य सरकारने द्यावा!

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नवी दिल्ली : कुत्र्यांनी घेतलेला चावा किंवा हल्ल्यामुळे जर कुणी जखमी झाला किंवा

जलद डिलिव्हरीच्या वेळापत्रकावर सरकारची भूमिका; क्विक कॉमर्स कंपन्यांना मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली :ऑनलाइन डिलिव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारने

मासिक पाळीतील तीव्र वेदनांनी १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू; महिलांच्या आरोग्याविषयी गंभीर प्रश्न

कर्नाटक : मासिक पाळीशी संबंधित वेदना अनेकदा हलक्याने घेतल्या जातात. मात्र अशा वेदना एखाद्या व्यक्तीसाठी प्रचंड

टाकाऊ कपड्यांतून साकारली कलाकृती; पंतप्रधान मोदीचं ६ फूट पोर्ट्रेट चर्चेत

ब्रह्मपूर (ओडिशा):येथील तरुण फॅशन डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणि परिश्रमातून एक अनोखी कलाकृती साकारत

काँग्रेसच्या माजी आमदाराला अटक; एनआरआय महिलेच्या तक्रारीवरून तिसरं प्रकरण उघड

पथनमथिट्टा (केरळ) : काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि आमदार राहुल ममकुटाथिल यांना महिलेशी गैरसंबंधान बाबत गंभीर

ताजमहालचे तळघर उघडणार! ३ दिवस मोफत पाहण्याची संधी

उर्सच्या कालावधीत पर्यटकांना आणि भाविकांना विशेष सवलती आग्रा: जगातील सातवे आश्चर्य मानल्या जाणाऱ्या