शिवसेनेच्या निवडणूक आयोगाविरोधातल्या याचिकेवर १ ऑगस्टला सुनावणी

  58

नवी दिल्ली : शिवसेना आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दावा केला आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून शिवसेनेची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.


न्यायालयातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण प्रलंबित निकाली निघेपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची मान्यता आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केलेल्या याचिकेत करण्यात आली आहे.


शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. या लढ्यादरम्यान खरी शिवसेना ओळखण्यासाठी निवडणूक आयोगात सुरू असलेल्या प्रक्रियेविरोधात उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले आहे.


निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. अशावेळी निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे. यात शिंदे गट खोटे बहुमत दाखवत संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे, असा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला