Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे जिल्ह्यात मनसेची ताकद वाढणार - अमित ठाकरे

ठाणे जिल्ह्यात मनसेची ताकद वाढणार – अमित ठाकरे

ठाणे : राज्याचे राजकीय वातावरण बदलले असून राजकारणात येण्यासाठी युवा पिढी विचार करत आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शाळा, विद्यालय, महाविद्यालयात मनसे प्रवेश करणार असून शिक्षणाच्या प्रश्नांवर भविष्यात आवाज उठवला जाणार आहे. त्याचबरोबरीने जिल्ह्यात मनसेचे एक आमदार असून येणाऱ्या काळात मनसेची ताकद वाढवण्यासाठी बळ दिले जाणार असल्याचा संकल्प मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला आहे. अमित ठाकरे हे ”महासंपर्क” यात्रा करत असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देत आहेत. ठाणे शहरातील विद्यार्थी सेनेचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, शहर अध्यक्ष रवींद्र मोरे मनविसे राज्य शहर चिटणीस संदीप पाचंगे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील तरुणांना मनविसे मध्ये सामील करण्यासाठी आणि तरुणानां मनसे कडे आकर्षित करण्यासाठी अमित ठाकरे रविवारी ठाण्यात आले होते, त्यावेळी अमित ठाकरे यांचे मोठ्या उत्साहात तरुणांनी स्वागत केले. अमित ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्ते पदाधिकरी यांच्या सोबत संवाद साधला. यावेळी अनेकांनी अंतर्गत वादाची तक्रार ठाकरे यांच्याकडे केली. मात्र अंतर्गत वाद नसतील तर पक्ष मोठा होत नाही असे देखील सूचक वक्तव्य अमित ठाकरे यांनी केले. तर मनविसेचे पदाधिकारी महापालिका निवडणुकीत उतरणार की नाही हा निर्णय राजसाहेब घेतील, असे देखील अमित ठाकरे यांनी सांगितले. आता महासंपर्क यात्रे दरम्यान तरुणानां संबोधित करून महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मनविसे ताकदीने उभी राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचं फुटबॉल प्रेम सर्वश्रुत आहेच. पक्ष बैठकांच्या निमित्ताने ते कुठेही गेले तरी त्यांना भेटायला फुटबॉलपटू येतातच. पण ठाण्यात असताना मनविसे पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाला मान देऊन अमित ठाकरे क्रिकेट खेळले आणि एकावर एक असे अनेक चौकार षटकार त्यांनी लगावले. ढोकाळी नाका येथील शरद पवार मिनी स्टेडियम येथे मनविसे पदाधिकाऱ्यांच्या दोन टीममध्ये हसत खेळत क्रिकेट सामना रंगला. मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे, मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे, संघटक यश सरदेसाई, शहरअध्यक्ष अरूण घोसाळकर यांच्यासह ठाण्यातील मनविसेचे अनेक पदाधिकाऱ्यांसमवेत अमित ठाकरे हा क्रिकेट सामना खेळले. विशेष म्हणजे, क्रिकेट सामन्यानंतर सर्वजण फुटबॉल सामनाही खेळले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -