Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीद्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या विजयी उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात नूतन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. बहुचर्चित,बहुप्रतीक्षित अशा सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ प्रदान केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू, लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान मोदी, मंत्रीपरिषदेचे सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर मान्यवर उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार घेण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राजघाट परिसरातील महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला भेट देत कोविंद यांनी पुष्पहार अर्पण करीत महात्मा गांधींचे अभिवादन आणि स्मरण केले. संसद भवनात जाण्यापूर्वी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -