मनसेने शिवसेनेला पुन्हा डिवचले

मुंबई : 'अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा' असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंसोबतचा राज ठाकरेंचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामुळे आता मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


बाळासाहेबांचे विचार आता राज ठाकरे पुढे घेऊन जाणार आहेत, बाकी कुणीही नाही, असा दावाच देशपांडेंनी केला आहे.


https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1551370257608355840

बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबतच तुम्ही व्यवहार केला. उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांकडून प्रतिज्ञापत्र मागतात यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. अशी जोरदार टीका देशपांडेंनी केली आहे.


शिवसेनेवर आलेल्या या वेळेचे क्रेडिट उद्धव ठाकरेंना जाते, अशी उपाहासात्मक टीका संदीप देशपांडेंनी केली आहे. केमिकल लोचा कुणाचा झालाय हे स्पष्ट होत आहे.


आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना त्यांनी काय काय काम केले याची आता केंद्र चौकशी करणार आहे. त्यात काही गैर असेल तर चौकशी झाली पाहिजेच, असेही देशपांडे म्हणाले.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस