करुणा जैनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

  65

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेटपटू करुणा जैनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या भारतीय महिला यष्टीरक्षक खेळाडूने रविवारी वयाच्या ३६व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. "मी अतिशय आनंदी आणि समाधानी भावनांसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करते आणि खेळासाठी काहीतरी योगदान देण्यासाठी उत्सुक आहे", असे करुणाने निवृत्ती जाहीर करताना म्हटले आहे.


करुणाने बीसीसीआय, एअर इंडिया, कर्नाटक, पुद्दुचेरी यांचेही आभार मानले आहेत. "यापैकी प्रत्येकाने मला खेळ आणि जीवनाबद्दल काहीतरी वेगळे शिकवले आणि आज मी जे काही आहे, त्यांच्यामुळेच आहे", असेही तिने म्हटले आहे.


बेंगळूरु येथे जन्मलेल्या करुणाने तिच्या कारकिर्दीत भारत, कर्नाटक, पुद्दुचेरी आणि दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व केले आहे. करुणाने नोव्हेंबर २००५ मध्ये दिल्लीत इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तिने ५ कसोटी सामन्यांत १९५ धावा केल्या आहेत. कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट २०१४ मध्ये खेळला होता.

Comments
Add Comment

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड