सातपाटी पालघर मार्गावर भीषण अपघात

पालघर (प्रतिनिधी) : पालघर सातपाटी रोडवरील चुनाभट्टी येथील सोहेल ईम्पेक्स कंपनी समोर मोठा अपघात झाला आहे. शाळेच्या मुलांना घेऊन जाणारी ईको व्हॅनच्या चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रथम माहितीत कळाले आहे. या अपघातामध्ये सातपाटी कडून पालघरच्या दिशेने अ‍ॅक्टिवावरून जाणारा दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मयत झाला आहे. मयत इसम पालघर जवळील सातपाटी गावाचा राहणारा असून नाव चेतन मेहेर आहे. सकाळी कामावर जाण्याकरिता तो निघाला असता या भीषण अपघाताचा बळी ठरला.


ईको व्हॅन ही दुचाकी स्वाराला ठोकत पुढे एमईसीबीच्या लोखंडी खांबाला धडक देऊन पलटी झाली. या व्हॅनमध्ये नऊ शाळेकरी मुले होती. सर्व मुलांना उपचाराकरिता पालघर येथील ढवळे रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या असून सर्वांची प्रकृती व्यवस्थित आहे. मात्र व्हॅन चालकाचा रस्त्यावर फिरत असलेल्या गुरांमुळे ताबा सुटला असल्याचे काही प्रथमदर्शींकडून बोलले जात आहे.


पावसाच्या दिवसात गुरे रस्त्यावर बसलेली किंवा रस्त्यावर फिरत असतात या गुरांमुळे नेहमीच अपघात होत असतात. या आधीही या रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांमुळे अपघात होऊन एका दुचाकी स्वाराला जीव गमवावा लागला होता. या रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांकरिता उपाय म्हणून ग्रामपंचायत, नगर परिषदेत कुठलीही यंत्रणाच नसल्याने निर्दोष वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. सातपाटी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांची दिवाळी गोड; आंबा-काजू नुकसान भरपाईपोटी ९० कोटी विमा रक्कम वाटप सुरू

शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होणार - पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांपेक्षा आपल्यासाठी

कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार : चार महिन्यांत तिसरी घटना, मुंबईतही हल्ल्याची धमकी!

कॅनडा : प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार झाला असून, गेल्या चार महिन्यांत

मुंबई-ठाण्यात पावसामुळे नागरिकांची तारांबळ; दिवाळीच्या खरेदीला मोठा फटका!

हवामान खात्याचा 'यलो अलर्ट' खरा ठरला; पुढील ६ ते ७ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई/ठाणे: पाऊस परत आला! हवामान

Rain : यंदाच्या दिवाळीत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा