द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपती पदाची शपथ

नवी दिल्ली : राष्ट्रपती पदाच्या विजयी उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात नूतन राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. बहुचर्चित,बहुप्रतीक्षित अशा सोहळ्यात भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ प्रदान केली.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत. यावेळी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू, लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान मोदी, मंत्रीपरिषदेचे सदस्य, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, इतर मान्यवर उपस्थित होते. भारताच्या राष्ट्रपतीपदाचा पदभार घेण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. राजघाट परिसरातील महात्मा गांधींच्या समाधी स्थळाला भेट देत कोविंद यांनी पुष्पहार अर्पण करीत महात्मा गांधींचे अभिवादन आणि स्मरण केले. संसद भवनात जाण्यापूर्वी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल