सोलापूर (हिं.स.) : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस रेल्वे प्रशासनाने सोमवार (१८ जुलै) रोजी सुरु केली. प्रवाशांनी इंद्रायणी एक्स्प्रेसचे गाजत-वाजत सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. मागील पाच दिवसानंतर लगेचच भिगवण-वाशिंबे दरम्यान यार्ड रिमोल्डिंग आणि दुहेरीकरण रेल्वे ट्रॅक जोडण्यासाठी नॉन इंटरलॉकिंगचे काम सोमवार २५ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान केले जाणार आहे.
यादरम्यान सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस २५ दिवसांसाठी रद्द करण्यात आली असून, याचा सर्वाधिक फटका इंद्रायणी एक्स्प्रेसने पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या सोलापूरकरांना बसणार आहे. सोलापूर विभागात दौंड-कुर्डूवाडी विभागात भिगवण-वाशिंबे या २६ किलोमीटरच्या मार्गाची चाचणी घेण्यात येणार आहे. हे काम सोमवर २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार असून, यात एकूण दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर एका गाडीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत असून, अवघ्या पाच दिवसात गाडी पुन्हा रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. नोकरदार, शिक्षण, व्यापारी, शेतकरी, चाकरमानी यांनी आधीच तिकीट आरक्षीत करुन ठेवलेल्या प्रवाशांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…