कोल्हापूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडावर पर्यटकांची ओली पार्टी रंगल्याची घटना समोर आली. या पार्टीचा एक व्हिडीओही सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
किल्ले पन्हाळगडावर असलेल्या झुणका भाकर केंद्रामध्ये काही पर्यटकांनी दारू पार्टी केली. याचा एक व्हिडीओही समोर आला. ही घटना समोर येताच खळबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये काही महिला देखील असल्याचे दिसून आले.
याघटनेमुळे राज्यभरातील शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातील शिवभक्तांनी पन्हाळगडावर एकत्र येत या सर्व प्रकाराला विरोध करताना तीव्र निषेध व्यक्त केला आहे. राज्यात होत असलेल्या किल्ल्यांच्या पडझडीवरून झोपी गेलेल्या पुरातत्व विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…