आंतरराज्य नेमबाजी स्पर्धेत आरवलीच्या रुई विचारे हिची चमकदार कामगिरी

देवरूख (प्रतिनिधी) : चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेल्या रुई विनायक विचारे हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (१९ जुलै ) रुईसह महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देणाऱ्या कॅडेट्सचा गौरव केला.


चंदिगड येथे ६ जुलै रोजी पार पडलेल्या आंतरराज्यीय एनसीसी नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून विविध गटांमधून १७ कॅडेट्स सहभागी झाले होते. रूई विचारे हिचाही समावेश होता. मूळची संगमेश्वर तालुक्यातील आरवलीची सुकन्या असलेली रुई विचारे ही सध्या पुण्यातील गरवारे महाविद्यालयामध्ये पदवी अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. महाराष्ट्रामधून चंदिगडमधील स्पर्धेत सहभागी झालेल्या रुई विचारे हिने ५० मीटर रायफल शूटिंग प्रकारात चमकदार कामगिरी केली. तिने तिच्या गटातून खेळताना संपूर्ण भारतात दुसरा क्रमांक पटकावला आहे.


पन्नास मीटर रायफल शूटिंगमध्ये तामिळनाडूतील मुलीने प्रथम, तर रुई विचारे हिने दुसरे स्थान पटकावले. कॅडेट्सनी महाराष्ट्र राज्याला सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावून दिले. याची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कॅडेट्सना मंगळवारी १९ जुलैला राजभवनात बोलावून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

Comments
Add Comment

शिवसेना नेते रामदास कदम यांना मातृशोक

मुंबई : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई गंगाराम कदम यांचे वृद्धापकाळाने निधन

दीड वर्षांच्या जलतरणपटू 'वॉटर बेबी' वेदाने इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड वर कोरलं नाव

रत्नागिरी : वय फक्त दीड वर्ष… आणि कामगिरी थेट राष्ट्रीय स्तरावर! रत्नागिरीच्या वेदा सरफरेने देशातील सर्वात लहान

मोबाईल नेटवर्कसाठी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

रत्नागिरी : महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी मतमोजणी

मडगाव, रत्नागिरी, उडुपी या स्थानकांमध्ये ‘५ जी’ नेटवर्कची जोडणी

मुंबई : कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकात आणि कोकण रेल्वेच्या अखत्यारितील रेल्वेगाड्यांमध्ये ‘५ जी’ नेटवर्क

देवरूखच्या ‘सप्तलिंगी लाल भात’ची राष्ट्रीय बाजारात चमक

संगमेश्वर तालुक्याला मिळणार नवी ओळख देवरूख (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यातील सुपीक जमीन, सप्तलिंगी नदीचे

महायुतीतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जाणार

ना. उदय सामंत यांची घोषणा महायुतीचा अखेर सस्पेन्स संपला नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारांची