राजापूर (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या तीन शाळा या वर्षी बंद झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या तालुक्यातील एकूण ३२ शाळा बंद झाल्या आहेत. तालुक्यातील शून्य पटसंख्या असलेल्या २९ शाळा बंद झाल्या होत्या. त्यामध्ये या वर्षी देवाचेगोठणे केंद्रातील केरावले, जवळेथर केंद्रातील हातदे शाळा क्र. २ व शिवणेखुर्द केंद्रातील बारसू खालचीवाडी शाळा क्र. २ या तीन शाळा बंद झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत ३२ शाळा बंद झाल्या आहेत.
या सर्व शाळा १ ली ते ४ थीपर्यंतच्या होत्या. यापूर्वी राजापूर बागकाझी उर्दू, वाटूळ क्र. २, धोपेश्वर तिठवली धनगरवाडी, दोनिवडे गवळीवाडी, करक क्र. ४, मिठगवाणे क्र.२, गोठणे दोनिवडे क्र. ५ तळगाव क्र. ३, परूळे क्र १ पाचल क्र. ४ ओझर धनगरवाडी, मोसम क्र. ३, सागवे हमदारे, निवली, तिवरे आडिवरे, भंडार साखरी मिरगुले पाखाडी या शाळांचा समावेश आहे.
एकीकडे शून्य पटसंख्या झालेल्या शाळा बंद करण्याचा निणर्य घेतला आहे. मात्र त्याच ठिकाणी पुन्हा एकदा काही कालावधीनंतर मुले आढळून आल्यास त्यांच्या शिक्षणांची व्यवस्था काय? यासंदर्भात शासनाने कोणतेही सूचना संबधित विभागाकडे दिलेली नाही. यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखादे वेळी कोरोनासारखा महाभयंकर आजार पुन्हा उद्भविल्यास परगावी असलेले नागरिक शेवटी आपल्या मूळ गावी येतात. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही असतात. अशा वेळी त्या मुलांच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…