मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना काळात वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएम मशीन्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला कोरोना प्रादूर्भाव आणि वाढती रेल्वे प्रवासीसंख्या या पार्श्वभूमीवर पुन्हा रेल्वे स्थानकावरील एटीव्हीएम मशॅन्स प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या.
दरम्यान, तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच जलद सुविधेसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हीएम मशॅन्सची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवरील स्थानकात आणखी येत्या काही दिवसांत २६३ नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील सर्व एटीव्हीएम मशीन्स कोरोना काळात दोन वर्षांहून अधिक काळ बंद आहेत. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने या यंत्रणा पुन्हा हळूहळू सुरू होत आहेत. सर्वाधिक प्रवासी संख्या असणाऱ्या चर्चगेट ते डहाणूपर्यंत स्थानकांवरील जवळपास ११३ नव्या एटीव्हीएम मशीन्स बसवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात प्रस्ताव मंजुरीसाठी असल्याची माहिती देण्यात आली. लवकरच यावर अंतिम निर्णय होऊन एटीव्हीएम टप्प्याटप्प्यात बसविले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…