मुंबई : शिवसेना युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई देसाई याची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्याच्या ऐवजी शिंदे गटातील किरण साळी याची युवासेनेच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वरुण सरदेसाई हा आदित्य ठाकरेंचा मावसभाऊ आहे. विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व कामकाजात वरुण सरदेसाईने महत्त्वाची भूमिका राबवली होती. त्याच्यावर एकनाथ शिंदेंनी आरोप केले होते. आक्रमकपणे आंदोलन असो की, महाराष्ट्रभर युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी, आदित्य ठाकरेनंतर युवासेनेचा चेहरा म्हणून त्याच्याकडे पाहिल्या जात होते. मात्र त्याच्या हकालपट्टीने एकप्रकारे आदित्य ठाकरेंनाच शिंदे गटाकडून आव्हान देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी सुरू केली आहे. गेली अनेक दिवस बंडखोरांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली अशा बातम्या पक्षाच्या मुख्यपत्रातून देण्यात येत आहेत. यात किरण साळी, राजेंद्र जंजाळ यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली, तर शिवसेनेतून आमदार संतोष बांगर, आमदार सुहास कांदे यांच्यावर शिवसेनेविरोधात काम केल्याचा आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
युवासेनेच्या अध्यक्ष पदासाठी वरुण सरदेसाई यांचे नाव चर्चेत होते. आदित्य ठाकरेंवर मंत्रिमंडळाची जवाबदारी असताना त्यांना महाराष्ट्रभर युवासेनेचे जाळे तयार करणे किंवा अनेक युवासेनेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्य होत नव्हते. यावेळी त्यांच्यावर युवासेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याचा माणस होता. मात्र, त्यांना पक्षातून असलेल्या विरोधामुळे ही नियुक्ती झाली नव्हती. मात्र ठाकरे कुटुंबियाबाहेरील व्यक्तिचा शिवसेनेत आणि युवासेनेत वाढणारा दबदबा यामुळे त्यांना मोठा विरोध होत होता.
बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…
सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…
उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…
लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…
नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…
दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…