तेलवाहू नौका उलटून गुहागरच्या किनाऱ्यावर, प्राणहानी नाही

रत्नागिरी (हिं.स.) : जयगड समुद्रात उलटलेले सिंगापूर येथील तेलवाहू कंपनीची अजस्र नौका लाटांच्या तडाख्याने उलटली असून ती सोमवारी मध्यरात्री गुहागरच्या समुद्रकिनारी आली आहे. नौका उलटली असली, तरी प्राणहानी झालेली नाही. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारी उगलमुगले आणि गोसावी यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. ते पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली.


सिंगापूर येथील तेल कंपनीची तेलवाहू नौका गेल्या २२ जून रोजी कोलंबो येथून निघाली. ती समुद्रात कलंडल्याने त्याचा समुद्रातील संपर्क तुटला होता. गेल्या ९ जुलैपासून रडारवर या नौकेचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यामुळे नौकेचा शोध सुरू होता.


ही नौका रत्नागिरी तालुक्यातील जयगडजवळच्या खोल समुद्रात किनाऱ्यापासून १३ सागरी मैलांवर काल तटरक्षक दलाला आढळली होती. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही नौका पूर्णपणे उलटली. त्यामुळे त्यातील तेल आणि इतर वस्तू समुद्रात वाहून गेल्या. नौकेवरील कर्मचारी मात्र सुखरूप आहेत. किनाऱ्यावरील नागरिकांनी या नौकेतून वाहत वाहत किनाऱ्यावर आलेल्या वस्तूंना हात लावू नये. तसेच काही संशयित वस्तू आढळल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

'विकास आणि संस्कृतीला समान महत्त्व देत कार्य करणार'

त्र्यंबकेश्वर (प्रतिनिधी) : कुंभमेळ्यासाठी जगभरातून लाखो-कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणार

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच प्रारुप मतदार यादी केली प्रसिध्द

महापालिकेने केले स्पष्ट मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप

स्वच्छ वायूसाठी युवकांची सक्रियता

महापालिकेच्यावतीने चेंबूर येथे कार्यक्रमाचे आयोजन, येत्या २८ नोव्हेंबर रोजी पार पडणार कार्यक्रम मुंबई (खास

लातूरमध्ये नगरपंचायत निवडणुकीत शिउबाठाला मोठा धक्का; ११ उमेदवारांनी घेतली माघार

लातूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण गोंधळले

भारताच्या मुलींनी सलग दुसर्‍यांदा जिंकला कबड्डी वर्ल्डकप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नोव्हेंबरचा महिना भारतीय महिला खेळाडू गाजवताना दिसत आहेत. २ नोव्हेंबर रोजी हरमनप्रीत

पाकिस्तानच्या शेजाऱ्याने दिली गोल्डन ऑफर

नवी दिल्ली : अफगाणिस्तानचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अलहाज नूरुद्दीन अजीजी सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.