अफ्रिकेतील घाना देशात मारबर्ग विषाणूचा संसर्ग; डब्ल्यूएचओ कडून अलर्ट

  87

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वच देशात कोरोनाने थैमान घातलेले असताना आता आणखी एका व्हायरसने जगाचे टेन्शन वाढवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना आणि इबोलाहून अधिक जीवघेणा हा व्हायरस असल्याचे म्हटले जात आहे. पश्चिम अफ्रिकेतील घाना देशात 'मारबर्ग' या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


घानातील दक्षिण अशांती भागात या विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे या विषाणूचा संसर्ग वेग आणि मृत्यूदर अधिक असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. मारबर्ग विषाणू संसर्ग झालेल्या प्राण्यामधूनही पसरतो. यात वटवाघळाचाही समावेश आहे. हा विषाणू ज्याला संसर्ग झाला त्याच्यावर वेगाने परिणाम करतो. यामुळे बाधित व्यक्तिला तीव्र ताप, अंतर्गत व बाह्य रक्तस्राव आणि गंभीर डोकेदुखीचा त्रास जाणवतो.


मारबर्ग विषाणू इबोला विषाणू इतकाच जीवघेणा आहे आणि त्यावर अद्याप कोणतेही औषधोपचार किंवा लस उपलब्ध नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, मारबर्ग विषाणूबाबत त्वरित खबरदारी न घेतल्यास या विषाणूच्या प्रसारामुळे परिस्थिती अनियंत्रणात येऊ शकते.

Comments
Add Comment

भूकंपानंतर आता रशियात ज्वालामुखीचा उद्रेक! राखेचे लोट ६,००० मीटर उंचीपर्यंत

मॉस्को: रशियाच्या कामचटका प्रांतातील Petropavlovsk येथे ८.८ तिव्रतेचा भीषण भूकंप झाल्यानंतर आता याच ठिकाणी ज्वालामुखीचा

पाकिस्तानात ५.१ रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप

इस्लामाबाद: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये रविवारी (३ ऑगस्ट) भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. पाकिस्तानच्या नॅशनल

'भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही...' डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आता रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबवू शकतो,

२५% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला! एक आठवड्यासाठी दिलासा

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली होती, जी १

ट्रम्प यांनी ४१ टक्क्यांपर्यंत लावला टॅरिफ, आदेशावर केली स्वाक्षरी, भारतासह ७० देशांवर होणार परिणाम

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घेताना यांनी अनेक देशांच्या वस्तूंवर १० ते ४१

Ashish Shelar : नेटफ्लिक्सने मराठी कंटेंट क्रिएटर्स व मनोरंजन उद्योगासोबत भागीदारी करावी : मंत्री आशिष शेलार

सांस्कृतिक कार्य मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे आवाहन लॉस एंजेलिस : मनोरंजर