पुण्याच्या भामट्याने चार महिला आमदारांना फसवले

  58

पुणे : पुण्याच्या भामट्याने राज्यातल्या चार महिला आमदारांची फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुण्यातल्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यमातून हे पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई आजारी होती म्हणून एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांकडे मदत मागितली होती. मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र तो फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तक्रार दिली होती. त्यानुसार पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुकेश राठोड असे आरोपीचे नाव आहे. त्याने पुण्यातील आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडून ४३०० रुपये उकळले होते. गुगल पे च्या माध्यमातून पैसे दिले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या