नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मदरसा मॉर्डनायजेशन स्कीम अंतर्गत आता केवळ टीईटी उत्तीर्ण शिक्षकच राज्यातील मदरशांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकणार आहेत. भर्तीच्या नियमांमध्ये लवकरच बदल करण्यात येणार आहे. योगी सरकारने मदरशांमधील शिक्षणामध्ये बदल करत हिंदी, इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाजिक ज्ञान यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
योगी सरकारने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार मदरशांमध्ये आता २० टक्के पारंपरिक शिक्षण तर ८० टक्के आधुनिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. स्थानिक पातळीवरील मदरशांमध्ये एक शिक्षक असेल, तर इयत्ता पाचवीपर्यंतचं शिक्षण देणाऱ्या मदरशांमध्ये चार शिक्षक असणे अनिवार्य असणार आहे. तसेच इयत्ता ६ ते ८ वीपर्यंत दोन आणि इयत्ता ९, १० वीच्या स्तरावरील मदरशांमध्ये ३ शिक्षक मॉडर्न अभ्यासक्रम शिकवण्यासाठी नियुक्त केले जाणार आहेत.
शिक्षकांच्या भर्तीसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांनाच मदरशांमध्ये शिक्षण देता येईल. राज्यस्तरीय टीईटी उत्तीर्ण शिक्षकच मदरशांमध्ये भर्तीसाठी पात्र समजले जातील. आजवर मदरशांमध्ये शिकवणी देणाऱ्या शिक्षकांना कोणतीही अट नव्हती. याशिवाय पारंपरिक शिक्षण ८० टक्के आणि आधुनिक शिक्षण केवळ २० टक्के दिले जात होते. त्यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक शिक्षणात मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी अलिप्त राहत होते. योगी सरकारने पुढाकार घेत आता मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात अामूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली आहे.
मदरशांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणात बदल करण्यासाठी गेल्याच आठवड्यात यूपी मदारसा इ-लर्निंग मोबाइल अॅपचे देखील लॉन्चिंग करण्यात आले आहे. याच्या माध्यमातून मोबाइलच्या सहाय्यानं शिक्षण देण्यात येणार आहे. मुलांना डिजिटल शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. या अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नाइट क्लासेस देखील अटेंड करता येणार आहेत.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…