Saturday, July 5, 2025

स्वामी सुखाचा संदेश

स्वामी सुखाचा संदेश
विलास खानोलकर

जगभर फिरती स्वामी
तसेच भक्तस्वप्नी जाती स्वामी ।। १।।

दाही दिशा फिरती स्वामी
दाही दिशा आदेश स्वामी ।। २।।

स्वामी नजरेत प्रसवे सुख
स्वामी पळविती अनेकांचे दुःख ।। ३।।

गिरगांव, दादर, ताडदेव, बांद्रा
चेंबूर, कुर्ला, ठाणे मठ इंद्रा ।। ४।।

स्वामी आदेश इंद्रावज्रा
प्रसन्न करीत भक्त स्वप्नीप्रजा ।। ५।।

गिरगांव मठी भक्त विश्वनाथ
पुसे स्वामी तुम्हीच आमचे नाथ ।। ६।।

जिंकाया जग काय करू नवनाथ
कशी होईल जनता सुखी प्राणनाथ ।।७।।

भक्त कसा होईल अमर
दुखणार नाही कमर ।। ८।।

विश्वनाथ स्वप्नी येई स्वामी
आधुनिक जगाचा संदेश स्वामी ।। ९।।

स्वामी वदे ऐका भक्तजन
सुखी संदेशाने आनंदी भक्तजन ।। १०।।

उठावे रोज छान पहाटे
सुवर्ण सूर्याआधी पहाटे ।। ११।।

करावा सूर्यनमस्कार वाटे
१०/१० नमस्कार आनंद वाटे ।। १२।।

तद्नंतर करावे लोमविलोम
करावी भ्रमरी अतिविलोभनीय ।। १३।।

करावा भुजंगासन, धनूर आसन
करावे शीर्षासन व शवासन ।। १४।।

किंवा एक तास भरपूर चालावे
वा अर्धा तास धावत पळावे ।। १५।।

मोड आलेली खावी कडधान्ये सकाळी
हळद घालून दूध प्यावे सकाळी ।। १६।।

तद्नंतर खावी भाजी पोळी भरपूर पालेभाजी
दुपारी संध्याकाळी ।। १७।।

खावी भरपूर फळे सर्व काळी
जीवनसत्त्वयुक्त खावी नव्हाली ।।१८।।

हनुमान लक्ष्मी गणेश सरस्वती
पूजा करावी दत्त शंकर पार्वती।।१९।।

कुलदैवताची आरती ईष्ट
नमस्कार करावा वरिष्ठ ।।२०।।

न करता भांडण तंटा
देवघरातील वाजवा प्रेमाने घंटा ।।२१।।

सोडून द्या सर्व वाईट व्यसने
पळून जाईल रोगराई करता आसने ।।२२।।

स्वच्छद फिरा निसर्ग बागेत
जगफिरा भरपूर प्राणवायू हवेत ।। २३।।

भेटावे संत सज्जना
लांब ठेवावे दुर्जना ।। २४।।

भेटावे आनंदे बहीण-बंधू
भेटावे प्रथम अंध-अधू ।। २५।।

करू नये राग राग
गावे मन मल्हार राग ।। २६।।

प्रकटावे अभ्यासून भरपूर
मैदानात आनंदाने खेळावे भरपूर ।। २७।।

तोंडी ठेवा साखर साखर
डोक्यावर ठेवा बर्फाची खापर ।। २८।।

लावूनी पायाला भिंगरी
उद्योगाची उंच करा लगोरी ।। २९।।

नका खाऊ बाहेर भंगार
तब्येतीला नका लावू अंगार ।। ३०।।

नाही इंजेक्शन बाटलीत औषध
टॉनिक चांगल्या विचारांचे औषध ।।३१।।

नाचा बागडा तुम्ही हसा
सदोदित आनंदाचा वसा ।। ३२।।

महिन्यातून एकदा करा उपवास
ईश्वर करेल परीक्षेत पास ।। ३३।।

भरपूर गाळा कष्टाचा घाम
सारे काम करा तमाम ।। ३४।।

रहा नेहमी हसत खेळत उत्साही
अंगात रक्त ठेवा उसळते प्रवाही ।।३५।।

रहा नेहमी भरपूर साहसी
स्वप्न पूर्ण करा उद्योगूनी साहसी ।। ३६।।

राहा नेहमी धैर्यवान
बुद्धीशक्तीने हरवा अफझलखान ।। ३७।।

भविष्याचे करा दिन-रात नियोजन
कामाचे करा वेळ पाहूनी नियोजन ।।३८।।

हसत ठेवा वृद्धत्वाचा महान ठेवा
नातू पणतू गोड खवा ।। ३९।।

स्वामी समर्थांचा हा आदेश पाळा
शंभर वर्षे आनंदाने स्वामी नाम पाळा ।।४०।।
Comments
Add Comment