मीरा रोड : मीरा रोडमध्ये भाजप महिला मोर्चा महाराष्ट्राच्या प्रदेश महिला प्रमुख सुलताना समीर खान यांच्या गाडीवर दोन अज्ञात इसमांनी रविवारी रात्री हल्ला केला. यात सुलताना यांच्या डाव्या हातावर दोन ठिकाणी जखमा झाल्या असून उपचार करुन त्यांना सोडण्यात आले.
सुलताना काल रात्री त्यांच्या पतीसोबत कारने कामानिमित्त निघाल्या होत्या. एवढ्यात मीरा रोडमधील नया नगरजवळ दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन तरुणांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ करत गाडीवर हल्ला केला. तसेच धारदार शस्त्राने सुलताना यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पळ काढला. सुदैवाने यात फक्त सुलताना यांच्या हाताला दुखापत झाली. यावेळी सुलताना यांच्या पतीने आरडाओरडा केल्याने इतर नागरिक तिथे जमा झाले आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने त्यांच्या पतीने त्यांना मीरा रोडच्या इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तिथे त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले. त्यांच्या हातावरील दोन जखमांवर तीन टाके घातल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर सुलताना खान फारच घाबरल्या आहेत. त्या जबाब देण्याच्या स्थितीत नाहीत. आज तिचा जबाब नोंदवला जाईल, असे सुलताना यांच्या पतीने सांगितले. जबाब नोंदवून घेतल्यावर आरोपींवर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस म्हणाले.
दरम्यान सुलताना यांनी ४ जुलै रोजी फेसबुक अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. “आपल्याला मुंबईच्या पदाधिकाऱ्याकड़ून धमकी येत असल्याचा दावा सुलताना या व्हिडीओमध्ये करत आहेत. तसेच आपला पूर्वीचा व्हिडीओ कोणीतरी डिलीट केल्याचेही त्यांनी सांगितले. “ना डरी हूं… ना डरुंगी,” असे त्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. त्यामुळे या हल्ल्यातील आरोपी कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी अशाप्रकारे हल्ला का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर महिलेच्या पतीने ही पक्षाची अंतर्गत बाब असल्याचा संशय व्यक्त केला असून सुलताना यांनी पक्षाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे, असे त्यांनी सांगितले.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…