नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडिमटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिंधुने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या सेईना कावाकामीला पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
सिंधूने ३२ मिनिट सुरु असलेल्या सामन्यात सेईना कावाकामीला २१-१५, २१-७ असे पराभूत केले. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अया ओहोरी किंवा चीनच्या जी यी वांग यांच्याशी होईल. या आधी जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या पीव्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जगात १९ व्या क्रमांकावर असलेल्या हैन यू हिला १७-२१, २१-११, २१-१९ असा पराभव केला होता.
२०२२ मध्ये सिंधूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. याआधी तिने सुपर ३००च्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. आता तिने प्रथमच सुपर ५००च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…