भाजप-सेना युतीचे सरकार स्थापन होताच कणकवलीला मिळाला विकास निधी

Share

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीला नागरी सहाय्यक योजना विकसित करणे या कामाकरिता २ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वीच कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून आमदार नितेश राणे यांच्याकडे ही निधीची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात तातडीने सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानुसार राज्य शासनाने तातडीने कणकवली नगरपंचायतला सदर निधी मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

या योजनेअंतर्गत कणकवली शहरातील जनतेच्या हिताची अनेक निधी अभावी रखडलेली कामे करता येणार आहेत. आमदार नितेश राणे यांनी याकरिता सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीने निधी मंजुरीची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेण्यात आली असल्याचेही नलावडे यांनी सांगितले. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा या निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेला प्रशासकीय मान्यतादेखील देण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरात आता या योजनेअंतर्गत लवकरच कामे सुरू करण्याचा मार्ग निधीमुळे मोकळा झाला आहे.

Recent Posts

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

19 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

44 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

2 hours ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

3 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

3 hours ago