मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी येत्या १८ जुलैला मतदान तर २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत येणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भेट घेतली आहे. त्यामुळे द्रौपदी मुर्मू याही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार का हे पहावे लागणार आहे. कारण आज त्या मुंबई दौऱ्यावर असल्या तरी ठाकरेंशी त्यांच्या कोणताही कार्यक्रम ठरला नसल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
द्रौपदी मुर्मू आज मुंबई दौऱ्यावर असून त्या तीनच्या सुमारास विमानतळावर दाखल होणार आहेत. पाचनंतर त्या पुन्हा दिल्लीकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे या कालावधीत मुर्मू मातोश्रीवर जाणार का, हे पहावं लागणार आहे.