नवी दिल्ली : श्रीलंका, पाकिस्तानसारखे छोटे-छोटे देश आर्थिक संकटात सापडलेले असताना आता जगात सर्वाधिक शक्तिशाली असणाऱ्या अमेरिकेलाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेत महागाई ४० वर्षांमधील सर्वाधिक उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे याचा परिणाम इतर देशांसह भारतावरही होणार आहे.
अमेरिकेतील महागाईचा दर ९.१ टक्के आहे. भारतीय बाजाराच्या दृष्टीने हा दर दोन टक्क्यांहून अधिक आहे. डॉलरच्या उलाढालीचा परिणाम जगातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. यामुळेच अमेरिकेतील महागाईच्या संकटामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचे संकटही वाढण्याची चिन्ह आहेत.
महागाई वाढल्याने अमेरिकेच्या बँकीग क्षेत्रात अर्थात फेडरल रिजर्व्हच्या दरांमध्ये तीव्र वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात करतील. गुंतवणूकदार बाहेर पडल्याने रुपया आणखी घसरण्याची शक्यता आहे. यामुळे आयातही अधिक महाग होऊ शकते. शिवाय अमेरिकन उत्पादनांच्या किंमती देखील वाढतील.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…