नवी मुंबई (वार्ताहर) : उद्धव ठाकरे रागावले हे फक्त त्यांच्या पत्नीने पाहिले आहे. त्यामुळे फोनवर झालेल्या बोलण्यावरून मी रागावलो आहे, असे म्हणणे योग्य नसून उद्धव ठाकरे यांचे आता रागवण्याचे दिवस राहिले नाहीत, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वाशीत उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत म्हटले. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम असे म्हटल्याने मी रागावलो होतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. यावर राणे यांना पत्रकारांनी विचारले असता वरील वक्तव्य राणे यांनी केले.
आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या अानुषंगाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यावेळी त्यांनी फोनवर अस्सलाम वालेकुम म्हटल्यावर मी भडकलो, त्यानंतर त्यांनी जय श्रीराम असे म्हटले, असे उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. याबाबत राणे यांना विचारले असता उद्धव ठाकरे हे घरीच बसले होते आणि फोन घेतला होता. त्यामुळे ठाकरे रागावले आहेत हे कुणीच सांगितले नसून त्यांनी त्यांच्या तोंडूनच सांगितले आहे. त्यामुळे रागवण्याइतके दिवस उद्धव ठाकरे यांचे राहिले नसून त्यांचे कसे चालले आहे ते दिसतच आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे आज कोणी नाहीत. त्यामुळे त्यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केलेल्या आरोपांच्या बाबतीत उत्तर देताना केला.
‘राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावे असे त्यांचे दिवस राहिलेले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावे लागत आहे,’ असाही खोचक टोला राणेंनी लगावला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, ‘या सरकारचे मंत्रिमंडळ तर झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यात आहेत, तर उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. आज ते कुणीच नाहीत’.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…