शिर्डी (वार्ताहर) : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास मंगळवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. हा उत्सव तीन दिवस चालणार आहे. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी पोथी, विश्वस्त सचिन कोते व विश्वस्त डॉ. जालिंदर भोर यांनी प्रतीमा तर विश्वस्त सुनील शेळके यांनी विणा घेऊन सहभाग घेतला.
यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत, विश्वस्त सर्वश्री अॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ संस्थानचे विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर यांनी प्रथम अध्याय, विश्वस्त सचिन गुजर यांनी द्वितीय अध्याय, विश्वस्त सचिन कोते यांनी तृतीय अध्याय, विश्वस्त महेंद्र शेळके यांनी चौथा अध्याय व विश्वस्त जयंतराव जाधव यांनी पाचवा अध्याय वाचन करून केला.
उत्सवाच्या मुख्य दिवशी बुधवारी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत ह.भ.प.सौ.स्नेहल संतोष पित्रे, डोंबवली (ठाणे) यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.५० या वेळेत अविनाश गांगुर्डे, नाशिक यांचा भक्ती गीतांचा कार्यक्रम, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून या दिवशी श्रींची शेजारती व दिनांक १४ जुलै रोजीची पहाटेचे श्रींची काकड आरती होणार नाही.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…