विलास खानोलकर
सीतारामपंत नेने, गारोडे येथील राहणारे. आपल्याला श्री रामाचा साक्षात्कार व्हावा म्हणून राम उपासना कडक रीतीने करीत असत. पुढे समर्थांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आले. महाराजांचे दर्शन होताच ते वैभव पाहून त्यांना अतिशय समधान वाटले आणि ‘मला आज राम भेटला’ असे त्यांना वाटले. मग माधुकरी मागून श्रींची सेवा करण्याकरिता ते तेथेच राहिले. त्यांनी सेवा अशी चालविली की, नित्य माधुकरी आणून जेवावे आणि श्रींसमोर राम उपासनेची माळ घेऊन जप करीत बसावे. त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाजवळ भाषण अगदी वर्ज्य केले होते. असो. काही दिवस गेल्यावर ऐके दिवशी दोन प्रहरी त्यांस स्वप्नात रामरूपाने दर्शन देऊन अनुग्रह केला.
स्वामी भक्तासाठी उभे
भक्त स्वामीदर्शनार्थ
उभे ।।१।।
येई कधी स्वामी स्वप्नी
प्रत्येक भक्ताची
अलग कथनी ।।२।।
पालक मातापिता पुसे स्वामी
बालकाच्या शिक्षणासाठी काय करू स्वामी ।।३।।
शिक्षण पाश्चात्य
भाषेत घ्यावे
की मातृभाषेतच
घ्यावे ।।४।।
अडकावे मुलांना २४ तास
हा क्लास झाला
की तो क्लास ।।५।।
बोलते स्वप्नी येऊन स्वामी
बालकांची काळजी
घेतील स्वामी ।।६।।
कोणत्या कॉलेजात गेले ज्ञानेश्वर नाथ
कोणत्या क्लासात
गेले निवृत्ती नाथ ।।७।।
शिवाजी महाराजांनी
कुठे केले एमबीए
राणाप्रतापांनी कुठे
केले एनडीए ।।८।।
टीळक रानडे गांधीची कोणती मातृभाषा
लालबालपालांची
देशप्रेमाची भाषा ।।९।।
सावरकर पोहूनी
गेले सप्तसागर
झाशीची राणीने थोपवला इंग्रज सागर ।।१०।।
दत्तगुरुचे चार अवतार
पार करतील
संसार सागर ।।११।।
नका अडवू २४ तास
स्वामी आशीर्वादाने काढतील फस्ट क्लास।।१२।।
घरोघरी जन्मतील ज्ञानेश्वर
मराठीची सरस्वती
ईश्वर ।।१३।।
भाभा नारळीकर शास्त्रज्ञ
सारे मोठे
मोठे शास्त्रज्ञ ।।१४।।
मातृभाषेत प्रगती सहविज्ञान
राष्ट्रपती कलामने
वाटले सारे ज्ञान ।।१५।।
पुल देशपांडे, अत्रे, काळे
वाटले जगभर मराठीचे नव्हाळे ।।१६।।
शेर्पा तेनसिंग, पीटी उषा,
लता, आशा,
जयश्री, उषा ।।१७।।
पाडगावकर करंदिकर जोशी
जी. ए., ग्रेस,
भविष्याचे ज्योतिषी ।।१८।।
गांगुली, विराट, सचिन,
विश्वनाथ आनंद,
नव्हते प्राचीन ।।१९।।
सॅम माणेकशा, पेठे कॅप्टन
हरवले दिनरात्र
पाक-चीन ।।२०।।
गौतम बुद्ध, महावीर, आंबेडकर
बनतील बालके
घरोघर ।।२१।।
मुली बनतील कॅप्टन
लक्ष्मी
कन्या मदर टेरेसा रूपी
लक्ष्मी ।।२२।।
प्रेम द्या श्यामच्या
आईप्रमाणे
पौष्टीक अन्न द्या श्रीकृष्णाप्रमाणे ।।२३।।
बनतील हनुमान,
बलराम प्रमाणे
राम-लक्ष्मण भरत रामायणाप्रमाणे ।।२४।।
खेळू द्या बागडू
द्या श्रीकृष्णाप्रमाणे
प्रेम द्या संस्कार
द्या श्रीरामाप्रमाणे ।।२५।।