राणी बागेत येणार नवे पाहुणे

मुंबई (प्रतिनिधी) : लवकरच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात नवे पाहुणे येणार आहेत. हे नवे पाहुणे चेन्नईच्या क्रोकोडाइल, सोलापूर प्राणीसंग्रहालय आणि ओडिशातील नंदनकानन प्राणीशास्त्र उद्यान येथून मगरी आणि सुसर आणली जाणार आहे. प्राणीसंग्रहालयातील मगरी आणि सुसर यांच्यासाठी पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरी आणि डेकचे बांधकाम ६० टक्के पूर्ण झाले आहे.


सध्या प्राणीसंग्रहालयात पाच मगरी आणि दोन सुसर आहेत. प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, “आम्हाला सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून चार मगरी मिळत असून ओडिशामध्ये जास्त संख्येने असलेल्या सुसर आणणार आहोत. १० मगरी आणि १० सुसर यांच्यासाठी प्राणीसंग्रहालयात पुरेशी जागा आहे. या अंडरवॉटर व्ह्यूइंग गॅलरीचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, जे प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख आकर्षण असेल.


'क्रोकोडाइल वर्ल्ड' हा प्राणीसंग्रहालयात हाती घेतलेल्या नवीन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये ४,००० चौरस मीटरवर पसरलेल्या पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरी बांधण्यात येणार आहे. व्ह्यूइंग गॅलरी दोन भागात विभागली जाईल. एका भागात मगरींसाठी पाण्याची व्यवस्था असेल. आवाराची दुसरी बाजू वाळू, माती आणि काही भागात झाडांसह पाण्याचे छोटे डबके यांसारख्या नैसर्गिक अधिवासाने सुसज्ज असेल. पर्यटकांना पाण्याखालील व्ह्यूइंग गॅलरीत जाऊन मगरी पोहताना पाहता येतील. शिवाय, डेकवर जाण्यासाठी पायऱ्या असतील. हे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

मुंबई : नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

खोदलेले चर बुजवण्यात कंत्राटदारांची हातचलाखी

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक रस्ते आणि पदपथाखालून विविध सेवा सुविधांचे जाळे जात असून यामध्ये तांत्रिक