टाळ, मृदुंगात प्रति पंढरपूर दुमदुमले

  101

मुंबई (प्रतिनिधी) : प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्याच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व प्रकारच्या उत्सवांवर निर्बंध होते. त्यामुळे भाविकांनी दोन वर्षे साध्या पध्दतीने आषाढी एकादशी साजरी केली होती. पण यंदा कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला.


प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळ्यातील विठ्ठल मंदीरात आषाढी एकादशी निमीत्त रविवारी भाविकांची मोठी गर्दी केली होती. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक भाविक पंढरपुरला जातात. मुंबईकर वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरामध्येही या दिवशी गर्दी होते.


मंदीरात दर्शनासाठी काळाचौकी, भायखळा, शिवडी, सायन, माहिम,परेल येथील भाविकांची गर्दी होती. चिमुरडी बालके, तरुण मंडळी, महिला, वयोवृद्ध आजी यांनी परीधान केलेला वारकऱ्यांचा वेश; फुगड्या; दिंडी आणि टाळ-मृदुंगाच्या तालावर विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा गजरात वडाळा परीसर दुमदुमुन गेला होता.


शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून दिंड्यांना सुरूवात झाली. यावेळी महिला वर्ग व पुरूष मंडळींनी वारकऱ्यांचा पारंपरिक वेश परिधान केला होता. काही ठिकाणी समुहाने अभंग गात विठ्ठलाचे स्मरण केले जात होते. एका ऐंशी वर्षाच्या आजीने फुगडी घालून आपला उत्साह दाखवून दिला. लहान बालके विठ्ठल रूक्मणीचा वेश परिधान करून दिंडीमध्ये सहभागी होते. हा संपूर्ण परीसर विठुरायाच्या भक्तिभावाने तल्लीन झाला होता.


यावेळी एका दिंडीमध्ये कुत्राही सहभागी झाला होता. शिवडीवरून ही दिंडी आली होती. कोरोनाच्या महामारीमुळे घातेलेल्या निर्बंधांमुळे गेली दोन वर्षे अनेक उद्योग धंदे ठप्प होते. मात्र दोन वर्षांनंतर यंदा मंदिर परीसरात दुकाने थाटलेली पाहायला मिळाली.

Comments
Add Comment

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन