Tuesday, October 8, 2024
Homeदेशशिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली 'वारी'ने राज्यात चर्चांना उधाण

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली ‘वारी’ने राज्यात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमित शाह आणि शनिवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेतेमंडळींची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मान्यवरांनी महाराष्ट्र आणि विविध विषयांवर चर्चा केली. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली ‘वारी’ने राज्यात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्याची माहिती दिली आहे. तसेच ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारताचे माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी, तुमचा बहुमूल्य वेळ आणि मला आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार!

आमचे ज्येष्ठ नेते मा. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जी यांचीही नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह सदिच्छा भेट घेतली.

आमचे नेते, मार्गदर्शक, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डाजी यांची, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्यासह भेट नवी दिल्ली येथे घेतली. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सातत्याने प्राप्त होत असते.

तर एकनाथ शिंदे म्हणाले, दिल्ली दौऱ्यादरम्यान महामहिम राष्ट्रपती सन्माननीय श्री. रामनाथ कोविंद जी यांची सदिच्छा भेट घेतली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत त्यांना सावळा विठुराया आणि रखुमाईची प्रतिमा भेट म्हणून दिली.

केंद्रीय संरक्षण मंत्री मा. ना. श्री. राजनाथ सिंह जी यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातील संरक्षण विषयक महत्वाच्या विषयांबाबत लागेल ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी याप्रसंगी दर्शवली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याच्या वतीने त्यांना विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली. राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारची वाटचाल नीट व्हावी यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यासमयी बोलताना दिले. यासमयी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

राजनाथ सिंह म्हणाले, “नवी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अप्रतिम संवाद साधला. मला विश्वास आहे की, ते राज्याच्या प्रगती आणि समृद्धीसाठी अविरतपणे काम करतील. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -