शिवसेनेने धनुष्यबाणाची आशा सोडली?

मुंबई : शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाने धनुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असे आवाहन केल्याने नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेला मिळणारे चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवा, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.


शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर आता शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्य बाण' वर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. बंडखोर गटाकडे शिवसेनेचे निवडणूक चिन्हं जाऊ नये आणि ते गेल्यानंतर काय करता येईल, त्याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना गाफिल न राहण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने निवडणूक चिन्ह गोठवल्यास नवीन चिन्ह कमी कालावधीत घराघरात पोहचवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


कायद्याच्या लढाईत अपयश आल्यास गाफिल राहू नका, पक्षाच्या नव्या चिन्हाची तयारी ठेवा. जे नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. “माझी प्रकृती ठीक असल्याने आता मी शिवसेना भवनात दररोज उपलब्ध आहे,” असे सांगत त्यांनी पदाधिकाऱ्यांना विरोधकांशी दोन हात करण्यास तयार असल्याचे संकेत दिले.

Comments
Add Comment

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी

केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या छोट्या बच्चूंसाठी गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांनी दिला असा मदतीचा हात...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक अर्थात केईएम रुग्णालयासाठी आता विख्यात गायिका

एसबीआयकडून मोठ्या प्रमाणावर भरती: ३,५०० अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि