विलास खानोलकर
जुन्नरमधील भीमाजी पाटील एकदा क्षयरोगाने आजारी झाले. श्रीबाबांच्या लीलांचे वर्णन ऐकून त्यांना कधी एकदा बाबांना भेटतो असे झाले होते. त्यांनी घरातील मंडळींना शिरडीला जाण्याची तयारी करण्यास सांगितले. बरोबर विश्वासू मंडळी घेऊन पाटील शिरडीस आले. त्यांची गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. दोघा-चौघांनी त्यांना उचलूनच बाबांसमोर आणले. त्या वेळी नानासाहेब व माधवराव तेथेच होते.
पाटलांना पाहून बाबा माधवरावांना म्हणाले,“श्यामा, असे किती आजार आणून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? तुझी ही कृती बरी नव्हे!’’ यावर माधवराव काहीही बोलले नाहीत. भीमाजी पाटलांनी बाबांच्या चरणावर डोके ठेवून,“बाबा, माझ्यावर कृपा करा. मला वाचवा.’’ अशी आर्ततेने विनंती केली. त्यांची व्यथा पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, “बाबारे, भिऊ नको. ज्या क्षणी तू शिरडीत पाय ठेवलेस त्याच क्षणी तुझे भोग संपले! अरे, इथला फकीर फार दयाळू आहे. तो दुःख दूर करतो, प्रेमाने जवळ घेतो. तो श्रद्धाभावाने त्याच्या मशिदीत येतो तो सुखावर आरूढ होतो.’’ त्याच वेळी साईबाबांची वचने ऐकून भीमाजीची चिंता सरली. पाटील थोडा वेळच साईच्या संगतीत होते, पण त्या अवधीत श्रींच्या कृपेने त्यांना वारंवार येणाऱ्या रक्ताच्या उलट्या थांबल्या. बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईच्या घरी राहिले. काही दिवसांनी पूर्ण बरे होऊन ते जुन्नरला परतले. ते बाबांचे भक्त झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य साईनामातच घालविले.
साईभक्त मानीती साई वैद्य
भयंकर यमालाही करीती कैद ।।१।।
साई देवता साईच दैवत
साईचे भक्त साई कुलदैवत ।।२।।
चांदोरकर व पाटील मित्र-मित्र
पाटील आजारी अनेक सत्र ।।३।।
क्षयरोगाने ग्रासले छातीचे यंत्र
केले अनेक धुपारते तंत्र मंत्र।।४।।
घातले साकडे यज्ञात लाकडे
तरी पाटील क्षयरोगाने कडके ।।५।।
साईभक्तास घातले साकडे
चांदोरकर वदले साई मनकवडे।।६।।
जाऊनी शिर्डीस वंदावे चरण
टळेल तुमचे तुरंत मरण ।।७।।
धापाटाकीत पोहोचले शिर्डी
साईचरणी विनंती सोडवा आदी।।८।।
रोगराईतून करा सुटका झडी
जीव कंठांसी क्षयरोग नडी ।।९।।
साई बोले तपासली तुझी नाडी
तेव्हाच चुकली यमाची गाडी ।।१०।।
मीच धन्वंतरी विश्वास
ठेव अंतरी
जगशील १०० वर्षे
दिगंतरी ।।११।।
साईभक्तांचा उसळे महापूर
साईशिर्डी पंढरपूर ।।१२।।
गाळा तुम्ही कितीही घाम
साईचे नाव घेता काम तमाम ।।१३।।
सोडा वाईट खोडी मुला बाळा
साईभक्तीची गोडी ।।१४।।
घ्या साईनाम निरंतर
साई ठेवणार नाही अंतर ।।१५।।
साईपूजा फोडेल संकटांचे पत्थर
साईपूजा गुलाब अत्तर ।।१६ ।।