चुनाभट्टी भागात दरड कोसळली, घरांचे नुकसान

मुंबई : सततच्या पावसामुळे चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरातील डोंगराचा काही भाग आज सकाळी घरांवर कोसळला. घटनेबाबत माहिती मिळताच चेंबूर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तत्काळ बचाव कार्य सुरु करण्यात आले असून तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. तिघेही जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास डोंगराचा काही भाग लागून असणाऱ्या घरांवर कोसळला आणि ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले आहे.


दरम्यान, कालही घाटकोपर येथे दरड कोसळली होती. मुंबईच्या घाटकोपर भागात खंडोबा टेकडीवर असलेल्या पंचशील नगर येथे एका घरावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घराचे मोठे नुकसान झाले.


घाटकोपरमध्ये ज्यावेळी घरावर दरड कोसळली, त्यावेळी त्या घरात राहणारे संतोष उपाले आणि त्यांचं कुटुंब असे पाच जण घरात होते. अचानक आवाज झाला आणि दरडीसह एक मोठे झाड घरावर कोसळले. भयभीत होऊन संपूर्ण कुटुंब जीव मुठीत घेऊन बाहेर पळाले. जीव वाचला, मात्र घराचे आणि घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. झाड आणि दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

Comments
Add Comment

राज्यात ढगाळ हवामानाचा मुक्काम

आंबा-काजू उत्पादक शेतकरी संकटात? मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडल्यानंतर आता

गरजू रुग्णांना उपचार नाकारल्यास कारवाई

मुंबई :राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला सरकारी आरोग्य योजनेअंतर्गत मोफत, दर्जेदार आणि त्रासमुक्त उपचार मिळणे

आश्रमशाळेतील शिक्षकांनाही टीईटी बंधनकारक

आदिवासी विभागाकडून शासन निर्णय जारी दोन वर्षांत उत्तीर्ण न झाल्यास सेवासमाप्ती मुंबई : राज्यातील शाळांतील

अनिल परब यांनी राडा करूनही निकटवर्तीयाची उबाठातून हकालपट्टी

मुंबई : ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून देण्यासाठी अनिल परब यांनी मातोश्रीत मध्यरात्री राडा घातला होता, त्याची

बेस्ट सेवानिवृत्त कामगार अधिकाऱ्यांचे बुधवारी आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या

मानवी वस्तीत जेरबंद केलेला बिबट्या वनखात्याकडून अधिवासात रवाना

कांदिवली : भाईंदर पूर्वेला पारिजात सोसायटी मध्ये, शिरून ७ नागरिकांना जखमी केलेल्या, बिबट्याला वन विभागाने